शरीरावरील दाट केस जास्त बुद्धीमत्तेचे सूचक

hair
लंडन : एका अभ्यासातून शरीरावरील दाट केस हे जास्त बुद्धीमत्तेचे निदर्शक असल्याचे समोर आले आहे. डॉ. ऐकाराकुडी अलायस मागच्या २२ वर्षांपासून शरीरावरचे केस आणि बुद्धीमत्तेचा संबंध या विषयावर अभ्यास करीत आहेत. इतर सर्वसामान्यांच्या तुलनेत शरीरावर जास्त केस असणारे जास्त उच्चशिक्षित असतात तसेच बहुतांश डॉक्टरांच्या छातीवर जास्त केस असतात, असे या अध्ययनातून समोर आले आहे.

अमेरिकेतील वैद्यक शाखेच्या विद्यार्थ्यांचा अभ्यास डॉ. ऐकाराकुडी यांनी केला. त्यात त्यांना ४५ टक्के पुरुष प्रशिक्षणार्थी डॉक्टरांच्या शरीरावर जास्त केस आढळले. इतर सर्वसामान्यांमध्ये १० टक्क्यांपेक्षा कमी जणांच्या शरीरावर जास्त केस होते. दक्षिण भारतात केरळमध्ये मेडिकल, इंजिनियरींग आणि कामगारांचा अभ्यास करण्यात आला. त्यामध्ये कामागारांपेक्षा मेडिकल, इंजिनियरींगच्या विद्याथ्र्यांच्या शरीरावर जास्त केस आढळले. विद्याथ्र्यांची शैक्षणिक प्रगती तपासली त्यामध्ये जास्त केस असणारे विद्यार्थी अन्य विद्याथ्र्यांच्या तुलनेत पुढे होते, असे अलायस यांनी सांगितले.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment