रूमानियम फोटोग्राफरने टिपल्या भारतीय नारींच्या छबी

mahila1
माएला नोरोस नावाच्या रोमानियातील महिला फोटोग्राफरने तिच्या प्रोजेक्ट अॅटलस ऑफ ब्यूटी अंतर्गत भारतभरातील २०० हून अधिक महिलांचे फोटो घेतले आहेत. पुण्यापासून पुष्करपर्यंत तसेच मुंबईपासून दिल्ली पर्यंत त्यासाठी तिने भटकंती केली असून गेले सहा महिने ती भारतात आहे. माएलाने काढलेल्या फोटोत झोपडपट्टीपासून ते बॉलीवूड पर्यंत कार्यरत असलेल्या महिलांचा समावेश आहे. माएलाने या प्रोजकटसाठी पुणे, मुंबई, नाशिक, दिल्ली, अमृतसर, पुष्कर, वाराणसी या शहरांना भेटी दिल्या आहेत.
mahila2

या फोटोंवरून माएलाचे निरीक्षण असे की भारतात अजूनही बहुसंख्य महिलांना अनेक आव्हाने पेलावी लागतातच पण भेदभावाचा सामनाही मोठ्या प्रमाणात करावा लागतो. तरी भारतीय महिला शक्ती आणि सौंदर्याचे असाधारण उदाहरण आहेत. आपली स्वप्ने प्रत्यक्षात उतरविण्यासाठी या बायका प्रचंड मेहनत घेतात असाही तिचा अनुभव आहे. अर्थात भारतीय महिलांच्या या गुणांची जगाला मात्र कल्पना नाही म्हणून या महिलांना जगासमोर आणण्याचा तिचा प्रयत्न आहे. भारतीय महिलांचे अंतर्गत व बाह्य सौंदर्य टिपण्याचा प्रयत्न केल्याचे माएला सांगते..
mahila3

रूमानियातील बुखारेस्टची रहिवासी असलेली ३० वर्षीय माएला पर्यटन फोटोग्राफर म्हणून प्रसिद्ध आहे. गेली तीन वर्षे ती विविध देशांत फिरून फोटो काढण्याचे काम करत आहेत.

Leave a Comment