यामाहाच्या ‘सलुटो आरएक्स’ची भारतात एंट्री

yamaha
नवी दिल्ली – जपानची मोटरसायकल कंपनी यामाहाने भारतामध्ये एन्ट्री लेव्हलच्या सलुटो आरएक्स बाइक दाखल केली. एक्स शोरुम, दिल्लीतील या बाइकची किंमत ४६ हजार रुपये ठेवण्यात आली आहे. कंपनीकडून एका लिटरमध्ये ८२ किलोमीटर मायलेजचा दावा करण्यात आला. पहिल्या वर्षी या बाइकच्या ६० हजार युनिट विक्री करण्याची योजना असल्याचे कंपनीने सांगितले. भारत देशातील सर्वात मोठे दुचाकी गाडय़ांची बाजारपेठ आहे. गेल्यावर्षी देशामध्ये एकूण १.६ कोटी युनिटची विक्री करण्यात आली आणि यामाहासाठी भारत रणनीतिक रुपाये महत्त्वाची बाजारपेठ असल्यराचे यामाहा मोटर इंडियाचे विक्री विभागाचे एमडी मासाकी आसानो यांनी सांगितले.

यामाहा सलुटो आरएक्सची वैशिष्टय़े : ४ स्ट्रोक, २ वॉल्व सिंगल सिलेंडर ११० सीसी इंजिन, ८२ किलोमीटर मायलेजचा दावा, टेलिस्कोपिक फ्रन्ट फॉर्कस, डय़ुएल शॉक एब्जॉर्बस, १३० एमएम ड्रम ब्रेक, वजन ९८ किलोग्रॅम, निळा, लाल, मॅट ब्लॅक आणि गेमिनिंग ब्लॅक रंगामध्ये दाखल

Leave a Comment