मेझूचा थ्रीडी प्रेस फंक्शनचा प्रो सिक्स लाँच

maizu
मेझू या चीनी स्मार्टफोन कंपनीने त्यांचा पॉवरफुल स्पेसिफिकेशनचा नवा स्मार्टफोन लाँच केला आहे.या फोनचे सर्वात महत्त्वाचे फिचर आहे थ्रीडी प्रेस फंक्शन तसेच याचे प्रोसेसिंगही दमदार आहे. गेल्या सप्टेंबरमध्ये लाँच केल्या गेलेल्या प्रो फाईव्हचे हे पुढचे व्हर्जन आहे. ३२ जीबी व ६४ जीबी अशा दोन व्हेरिएंटमध्ये लाँच झालेला हा फोन सध्या फक्त चीनमध्ये उपलब्ध असून त्याच्या किंमती अनुक्रमे २५०० युआन( २५५०० रूपये) व २८०० युआन ( २९ हजार रूपये) अशा आहेत.

या फोनसाठी ५.२ इंचाचा सुपर एमोलेड फुल एचडी, त्यालाच थ्रीडी प्रेस फंक्शनॅलीटीसह दिला गेला आहे. हे फिचर अॅपलच्या सिक्स एस व सिक्स एस प्लस प्रमाणे आहे. स्क्रिनला गुरील्ला ग्लास थ्री प्रोटेक्शन दिले गले आहे. तसेच होम बटणावरच फिंगरप्रिंट स्कॅनर आहे. फोनला ४ जीबी रॅम, माली टी ८८० जीपीयूही दिली गेली आहे. बॅक कॅमेरा २१.१ एमपीचा तर फ्रंट कॅमेरा ५ एमपीचा आहे. फास्ट चार्जिंगसाठी एमचार्ज ३.० तंत्रज्ञानाचा वापर केला गेला आहे. कनेक्टीव्हीटीसाठी फोरजी वायफाय, ब्ल्यूटूथ, जीपीएस, यूएसबी टाईप सी सपोर्ट आहे. हा फोन शँपेन गोल्ड, ब्लॅक स्टार, मूनलाईट सिल्व्हर रंगात उपलब्ध आहे.

Leave a Comment