जगातील सर्वात स्वस्त श्रवणयंत्र भारतीय वंशाच्या मुलाने बनवले

mukund
वॉशिंग्टन- जगातील सर्वात स्वस्त असे श्रवणयंत्र ह्युस्टन येथील भारतीय वंशाचा किशोरवयीन मुलगा मुकुंद वेंकटकृष्णन याने बनवले आहे. या यंत्राची किंमत ६० डॉलर्स किंवा अंदाजे ४,८०० रुपये इतकी आहे.

त्याने आपले उपकरण केंटुकी स्टेट सायन्स अॅंड इंजिनिअरिंग फेअरमध्ये सादर केले आहे. व्यावसायिक श्रवणयंत्र अमेरिकेत अंदाजे १,५०० डॉलर्सला मिळते. त्यामानाने वेंकटने बनवलेल्या उपकरणाची किंमत ही फारच कमी आहे. वेंकटने बनवलेल्या उपकरणात सर्वात महागडा भाग आहे तो प्रोसेसरचा. त्याची किंमत ४५ डॉलर्स आहे तर इतर पार्ट्स ची किंमत १५ डॉलर्स आहे. दोन वर्षे मेहनत घेऊन त्याने हे उपकरण बनवले आहे.

दोन वर्षांपूर्वी तो भारतात आला होता. त्यावेळी त्याने आपल्या आजी आजोबांना ऐकू कमी येण्यामुळे काय त्रास होतो याची जाणीव झाली. डॉक्टरांची भरमसाठ फी आणि श्रवणयंत्राचा खर्च यावर हजारो रुपये खर्च झालेले त्याने पाहिले आणि त्याच्या डोक्यात विचार घोळू लागला की ज्या लोकांची आर्थिक स्थिती हलाखीची आहे त्यांना श्रवणयंत्र म्हणजे चैनच वाटत असेल तेव्हा आपण असे यंत्र का बनवू नये ज्यामुळे सर्वांनाच फायदा होईल, असे म्हणून तो कामाला लागला आण दोन वर्षे मेहनत करून त्याने हे श्रवणयंत्र तयार केले. या उपकरणाची व्यावासायिक स्तरावर निर्मिती व्हावी यासाठी अनेक संस्थांनी मुकुंदला आर्थिक साहाय्य देण्याचा विचार केला आहे. व्यावसायिक स्तरावर याची निर्मिती केल्यास श्रवणयंत्राच्या निर्मितीचा खर्च कमी होईल.

Leave a Comment