चेन्नईचे श्रवण आणि संजय देशाचे ‘बाल करोड़पती’

app
नवी दिल्ली – चेन्नईची दोन मुलांनी कमाल केली असून १२ आणि १४ वर्षाच्या लहान वयात श्रवण आणि संजय या दोघांनी अॅप डेव्हलप करण्याचा स्वताचा व्यवसाय सुरु केला आणि आज ते या व्यवसायाचे यशस्वी मालक बनले आहेत. या दोघांना आपण देशातील बाल करोडपती म्हटले तर अतिशोयोक्ती ठरणार आहे.

आपल्याला कलेमुळे हे दोघे फेसबुकचा सर्वेसर्वा मार्क झुकेरबर्गला देखील भेटले आहेत. १४ वर्षांचा श्रवण त्यांच्या कंपनीचा अध्यक्ष आहे तर १२ वर्षाचा संजय मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आहे. या दोघांचे वय कमी असल्यामुळे भारतीय कायद्यानुसार यांच्या कंपनीची नोंदणी त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांच्या नावे करण्यात आली आहे. तरीसुद्धा श्रवण आणि संजय देशातील सर्वात कमी वयाचे उद्योगपती आहेत. २०११ साली या दोघांनी मिळून ‘गो डायमेन्शन’ नावाचे अॅप लॉन्च केले होते. आतापर्यंत या दोघांनी ११ अॅप डेव्हलप केले आहेत. या दोघांचे अॅप अॅपल प्ले स्टोर आणि गुगल प्ले स्टोरवर उपलब्ध आहेत.

Leave a Comment