संकटसमयी अवघ्या ७ मिनिटांत पोहोचणार मुंबई पोलिस

mumbai-police
मुंबई – देशातील महिलांवरील अत्याचाराच्या घटना अद्याप कायम आहेत. त्याच पार्श्वभूमीवर महिलांच्या सुरक्षेसाठी जास्तीत प्रयत्न राज्य सरकार व पोलिसांकडून केले जात असून त्याचाच एक भाग म्हणून मुंबई पोलिसांकडून लवकरच ‘प्रतिसाद’ हे सेफ्टी अॅप लाँच करण्यात येणार असून या अॅपद्वारे संकटात सापडलेल्या महिलेची मदत करण्यासाठी पोलिस अवघ्या ७ मिनिटांत पोहचू शकतील.

राज्याचे पोलिस महानिरीक्षक प्रवीण दिक्षित यांना या अॅपची मूळ कल्पना सुचली असून हे अॅप येत्या सोमवारी लाँच करण्यात येणार आहे. हे अॅप यापूर्वीच महाराष्ट्रातील इतर काही भागांमध्ये लाँच करण्यात आले होते आणि पुढील आठवड्यात ते मुंबईत देखील लाँच करण्यात येईल. हे अॅप मुंबईप्रमाणचे संपूर्ण राज्यात लाँच करून महिलांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असेल असे दीक्षित यांनी सांगितले.

Leave a Comment