रस्त्यावर येण्यापूर्वीच लोम्बार्गिनीच्या सर्व कार्सची विक्री

lombarghini
सुपरकार निर्मिती क्षेत्रातील कंपनी लोंबार्गिनीच्या लिमीटेड एडीशन कार्सची सर्व युनिटस विकली गेली असून ही कार अजून रस्त्यावर आलेली नाही. कंपनीने या मॉडेल्सची फक्त ४० युनिट बनविली जाणार असल्याची घोषणा केली होती आणि कारची किंमत आहे २० लाख डॉलर्स म्हणजे १३ कोटी रूपये. या कारसाठी शौकीनांनी अजिबात वाट न पाहता बुकींग सुरू होताच त्वरीत खरेदी केल्याचे समजते.

लोम्बार्गिनी कंपनीचा संस्थापक फेरूचिमो लोम्बार्गिनी यांच्या शताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या स्मरणाथे ही लिमीटेड एडिशन काढली जात आहे. कारची डिलिव्हरी २०१६ च्या अखेरीस सुरू होणार असून २०१७ पर्यंत चालणार आहे. फेसोचिमोची कंपनी पूर्वी ट्रॅक्टर बनवित असे आणि त्यातून त्यांनी खूप नफा कमावला. फरारी कारची लोकप्रियता पाहून त्यानेही ६३ साली त्यांची स्वतःची कार कंपनी सुरू केली.

लोम्बार्गिनीच्या या स्पेशल एडीशन कारला ६४९८ सीसी क्षमतेचे १२ व्ही ६० डिग्री एमपीआय इंजिन दिले गले आहे. सात स्पीड ट्रान्समिशन असून ० ते १०० किमीचा वेग ती २.८ सेकंदात घेते. तिचा टॉप स्पीड आहे ताशी ३५० किमी. कारसाठी स्पोर्टससीट दिल्या गेल्या आहेत व कार निर्मितीत कार्बन फायबरचा वापर मोठ्या प्रमाणावर केला गेला आहे. या कारच्या ४० युनिटमधील २० कूपे तर २० रोडस्टर मॉडेल्स आहेत.

Leave a Comment