या विमानासाठी दोन वर्षांची प्रतीक्षायादी

viman
एखाद्या कारसाठी प्रतीक्षा यादी असू शकते ही बाब आता आपल्या अंगवळणी पडलेली आहे. मात्र खासगी विमानासाठीही प्रतीक्षा यादी व तीही दोन वर्षांची असणे ही बाब अजूनतरी इतकी रूळलेली नाही. गल्फ स्ट्रीम जी ६५० बिझिनेस जेट ने ही कमाल करून दाखविली आहे. या विमानासाठी असलेल्या प्रतीक्षा यादीत वॉरन बफे ऑप्रा विनफ्रे इबेचा संस्थापक पियरे अशा अब्जाधीशांचा समावेश आहे. या विमानाची किंमत ४३० कोटी रूपये असून ते १२९६४ किमीचा टप्पा विनाथांबा गाठू शकते. विमानाचा वेग आहे ताशी ११४२ किमी.

कंपनीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार या विमानांच्या खरेदीसाठी २०० अब्जाधीश प्रतीक्षायादीत आहेत. गेल्या महिन्यात सिंगापूर एअर शो मध्ये हे विमान प्रदर्शित करण्यात आले होते. या विमान कंपनीचे मुख्यालय अमेरिकेतील जॉर्जिया येथे आहे. विशेष म्हणजे असेही समजते की या विमानाच्या सेकंड हँड खरेदीसाठी अनेकांनी नव्या विमानापेक्षाही जादा पैसे मोजले आहेत व त्याबद्दल कंपनीने जाहीर नाराजीही व्यक्त केली आहे. त्यामुळे या पुढे विमान देताना कंपनी खरेदीदाराकडून हे विमान लगेच विकणार नाही अशी लेखी हमी घेत आहे. सध्या प्रतीक्षायादीत असलेल्यांना विमान हातात मिळण्यास दोन वर्षे लागणार आहेत.

Leave a Comment