निसानच्या ‘डाटसन रेडी गो’चा लूक रिवील

redi-go
मुंबई – दिल्लीत आज पहिल्यांदा निसानच्या डाटसन रेडी गो या नव्या कोऱ्या कारचा लूक रिवील करण्यात आला आहे. द रेडी गो ही सर्वात छोटी गाडी जून महिन्यात भारतात लाँच होणार आहे. रेडी गो ही तिसरी गाडी आहे जी डाटसनची पोर्टफोलिओमध्ये अॅड झाली आहे. रेडी गो ही सर्वात लो बजेटमध्ये असणारी कम्फर्ट अशी कन्सेप्ट कार आहे. रेडी गोची हेडलॅम्प्स सर्वात आकर्षक करणारे आहेत. तसेच एलइडी डीआरएल बम्पर लावण्यात आले आहेत. या कारला आकर्षक असा स्पोर्टस लूक देण्यात आला आहे. रेडी गो आपल्या सेगमेंटमध्ये मारूती अल्टो ८०० तसेच हुंहाई इओनला टक्कर देणार आहे.

कंपनीने २०१४ दिल्ली ऑटो एक्सपोमध्ये डिस्पले केल्या गेलेल्या रेडी गो कन्सेप्टलर डाटसन रेडी गो कार आधारित आहे. यामुळे या गाडीत हाय सॉल्डर लाइन, हाय ग्राऊंड क्लियरेंस, रूफ रेल्स, चंकी व्हील ऑर्कीज यासारखे फीचर्स दिले गेले आहेत. इसे सीएमएफ ए प्लेटफॉर्म वर तयार करण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे ही गाडी खास आकर्षक मायलेज पद्धतीने डिझाइन केली आहे. डाटसन रेडी गोला पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही मॉडेल्समध्ये उतरवलं जाणार आहे. यामध्ये पेट्रोल मॉडेलमध्ये ०.८ लीटर ३ सिलेंडर इंजीनयामध्ये आहेत. जेव्हा की डिझेल मॉडेलमध्ये १००० सीसी ३ सिलेंडर इंजिन आहेत.

Leave a Comment