कॅसाडॅगा – अमेरिकेची सायकिक कॅपिटल

florida
अमेरिकेच्या फलोरिडा राज्यातील कॅसाडॅगा हे गांव सायकिक कॅपिटल म्हणून प्रसिद्ध आहे. यामागचे कारण म्हणजे येथील बहुतेक सर्व रहिवासी भूत प्रेतांशी ते संवाद साधू शकतात दावा करतात. केवळ ६२४ लोकसंख्या असलेल्या या गावात १०० हून अधिक हिलींग सेंटर्स आहेत. आणि येथील नागरिकांच्या भूतप्रेत, आत्म्याशी संवादाच्या दाव्याला स्थानिक प्रशासनही प्रोत्साहन देत आहे. या गावात पर्यटन वाढावे म्हणून त्याला पर्यटन विभाग स्पिरीच्युअल कँप म्हणून प्रमोट करत आहे.

गेल्या वर्षभरात या गावात २५ हजाराहून अधिक पर्यटक जगभरातून आले असल्याचे सांगितले जाते आहे. विशेष म्हणजे या गावाच्या आर्थिक उलाढालीचा मुख्य आधार गावचे नागरिकच आहेत. १८७५ मध्ये न्यूयॉर्कचे अध्यात्मिक गुरू जॉर्ज कॉल्बी यांनी हे गांव स्थापन केल्याचे सांगितले जाते. त्यानंतर येथे शेकडो लोक आले. या गावाच्या हवेतच असे कांही तरी आहे की माणूस आपोआप अध्यात्माकडे आकर्षित होतो असाही दावा केला जातो. येथील १०० हिलींग सेंटर्स त्यांचा व्यवसाय उत्तम प्रकारे करत आहेत आणि त्यांची प्रत्येकाची वेगळी स्टाईल आहे.

टॅरो कार्डस, हस्तरेषा यांच्या माध्यमातून येथील लोक आत्म्यांशी संवाद साधतात असे सांगितले जाते. इंडियन हिप्नोटिझम अॅकेडमीचे प्रमुख डॉ. जे.पी मल्लीक यांनी हिप्नोटिझमच्या सहाय्याने पूर्व जन्मातील घटना माणूस पाहू शकतो आणि मृतांच्या आत्म्याशी संपर्कही साधू शकतो असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे या गावातील लोक आत्म्यांशी संवाद साधण्याचा दावा करत असतील तर त्यात तथ्य असू शकते असे त्यांचे म्हणणे आहे.

Leave a Comment