एचटीसीचे झक्कास फीचरवाले स्मार्टफोन लाँच

htc
मुंबई: २०१६ मधील आपला सर्वात जबरदस्त स्मार्टफोन तैवानी कंपनी एचटीसीने लाँच केला असून या दोन स्मार्टफोनची नावे एचटीसी १० आणि एचटीसी १० लाइफस्टाइल अशी आहेत.

एचटीसी इंडियाच्या वेबसाइटवर एचटीसी १० लाइफस्टाइल लाँच करण्याचे संकेत दिले आहेत. क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८२० व्हेरिएंटच्या एचटीसी १०ची किंमत जवळपास ६९९ डॉलर (४६,५०० रु.) आहे. या स्मार्टफोनची डिलिव्हरी मे महिन्यापासून सुरु होणार आहे.

एचटीसी १०मध्ये ३२ जीबी मेमरी आणि ६४ जीबी मेमरी अशा दोन व्हेरिएंट उपलब्ध असून त्याची मेमरी २ टीबी पर्यंत मेमरी वाढविता येणार आहे. तर एचटीसी १० लाइफस्टाइलमध्ये ३ जीबी रॅम असणार आहे. एचटीसी १० मध्ये ५.२ इंच क्यूएचडी डिस्प्ले असणार असून याचे १४४०×२५६० पिक्सल एवढे रेझ्युलेशन आहे. तर एचटीसी १० मध्ये २.२Ghz क्वॉडकोअर स्नॅपड्रॅगन ८२० आहे. तर एचटीसी १० लाइफस्टाइलमध्ये १.८ Ghz क्वॉड कोअर स्नॅपड्रॅगन ६५२ प्रोसेसर आहे. दोन्ही स्मार्टफोनमध्ये अँड्रॉईड मार्शमेलो सपोर्ट आहे. तर दोन्ही स्मार्टफोनमध्ये १२ अल्ट्रापिक्सल रिअर कॅमेरा आहे. तर ५ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

Leave a Comment