टॉप रेटिंग रेल्वेत भारताची महाराजा एक्स्प्रेस

maharaja
जगातील टॉप रेटिंग रेल्वेमध्ये भारताच्या महाराजा एक्स्प्रेसचा समावेश झाला आहे तर जगातील टॉप रेटिंग लग्झरी हॉटेल्समध्ये न्यू यॉर्कमधील प्लाझा हॉटेलने बाजी मारली आहे. विशेष म्हणजे हे हॉटेल सहारा समुहाच्या मालकीचे आहे. या रेटिंग साठी जगातील अब्जाधीशांची मते विचारात घेतली जातात व त्यातून ही यादी तयार केली जाते.न्यू वर्ल्ड वेल्थतर्फे हे सर्वेक्षण केले जाते.

या यादीत टॉप रेटिंग रेल्वेत ईस्टर्न अॅन्ड ओरिएंटल एक्स्प्रेस (सिंगापूर, मलेशिया, थायलंड) हिला पहिला क्रमांक मिळाला आहे. त्या पाठोपाठ ब्ल्यू ट्रेन (द.आफ्रिका), प्राईड ऑफ आफ्रिका (रोवोस रेल), द ओरिएंट एक्स्प्रेस (युरोप, तुर्की) यांचा समावेश आहे. महाराजा एक्स्प्रेस चार नंबरवर आहे. यातून प्रवास करणार्‍या प्रवाशांना राजेशाही विलासात प्रवासाचा अनुभव मिळतो तसेच अतुल्य भारतातील संपन्न व सांस्कृतिक वारसा असलेल्या शहरांची सफर ही ट्रेन घडविते. यासाठी तिकीटांचे पॅकेज ३ हजार डॉलर्स पासून २४ हजार डॉलर्स पर्यंत आहे.

Leave a Comment