महाराष्ट्रावर सर्वात जास्त कर्ज

rbi
नवी दिल्ली – देशात अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असणारी देशातील २ सर्वात मोठी राज्ये महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशवर सर्वात जास्त कर्ज असल्याचे समोर आले आहे. ही माहिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) च्या ‘स्टेट फायनान्स : ए स्टटी ऑफ बजेट २०१५-१६’ मध्ये या अहवालामध्ये देण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्याचा वर्ष २०१६ मध्ये सर्वात जास्त कर्ज डोक्यावर असणा-या राज्यांमध्ये प्रथम क्रमांक असून ३.७९ लाख कोटी रुपयाचे महाराष्ट्राने कर्ज घेतले आहे. आर्थिक वर्ष २०१२-१३ नंतर राज्यांच्या दायित्त्वामध्ये दोन आकडी वाढ झाली आहे.

महाराष्ट्रानंतर कर्ज घेण्याच्या प्रकरणामध्ये उत्तर प्रदेशचा क्रमांक आहे. आरबीआयच्या अहवालानुसार ३.२७ लाख कोटी रुपयांचे कर्ज घेऊन उत्तर प्रदेश दुस-या स्थानावर असून ३.०८ लाख कोटी रुपयांच्या कर्जासह पश्चिम बंगाल तिस-या स्थानावर आहे. २.२६ लाख कोटींसह आंध्र प्रदेश चौथ्या तर २.३५ लाख कोटी रुपयांचे कर्ज घेऊन तामिळनाडू पाचव्या स्थानावर आहे. २.९२ लाख कोटी कर्ज घेऊन गुजरात सहाव्या स्थानावर आहे. ही राज्ये मागील वर्षातही याच स्थानावर होती. यानंतर कर्नाटक, राजस्थान, पंजाब, मध्य प्रदेश आणि हरियाणा यांचा क्रमांक आहे.

Leave a Comment