प्रत्येक स्मार्टफोनमध्ये २०१७ पासून असेल पॅनिक बटण

panic
महिला सुरक्षा लक्षात घेऊन स्मार्टफोन उत्पादन करणार्‍या भारतातील सर्व कंपन्यांना १ जानेवारी २०१७ पासून पॅनिक बटण असलेले फोनच बनविता येणार आहेत. या संदर्भातला अध्यादेश या आठवड्यात जारी केला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. परिणामी रस्त्यावर अथवा टॅक्सी, कॅब मधून एकट्याने प्रवास करताना महिलांना कोणताही धोका वाटला तरी त्या पॅनक बटण दाबून वेळेवर मदत मिळवू शकणार आहेत.

महिलांना या बटणाचा वापर करताना ते कांही वेळ दाबून ठेवावे लागेल त्यामुळे त्यंाचा ठावठिकाणा नातेवाईक, मित्रमंडळींना समजू शकेल. महिला बाल कल्याण मंत्रालय व माहिती तंत्रज्ञान व दूरसंचार मंत्रालयाने दीर्घ चर्चेनंतर पॅनिक बटण बसविणे बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला आहे. युपी सरकारने स्थापलेल्या निर्भया फंडातून यासाठीचे पैसे दिले जाणार आहेत. अस्तित्वात असलेल्या फोनवर हे सेफ्टी फिचर कसे अॅड करता येईल याचा विचार सुरू असल्याचेही सांगितले जात आहे. त्यासाठी पॅनिक बटणाप्रमाणे काम करणारे एखादे सॉफ्टवेअर तयार करण्याचा विचार असल्याचे समजते.

Leave a Comment