गुगलच्या कारला टक्कर देणार चीनची विनाचालक कार

china
चीन – २०१८पर्यंत चालकविरहित कार बाजारात आणण्याच्या प्रयत्नात चीनमधील एक ऑटोमोबाईल कंपनी आहे. चीनच्या ऑटोमोबाईल कंपनीने दोन चालकविरहित कारची प्रात्यक्षिकेही केली असून चीनने ही कार गुगलच्या कारला टक्कर देण्यासाठी बनवली आहे.

२०२०पर्यंत चीनच्या रस्त्यावर चालकविरहित कार धावतील, अशी आशा आहे. ही कार चालकाला त्याचा मार्ग शोधण्यासाठीही मदत करणार आहे. शहरातले रस्ते आणि महामार्गावर या गाड्या चांगल्या प्रकारे चालणार आहेत. मात्र या गाड्यांना नियोजित स्थळी जाण्यासाठी चालकाच्या मार्गदर्शनाची गरज लागणार आहे. याबाबत अधिक माहिती देताना ऑटोमोबाईल कंपनीने आम्ही या गाड्यांमधील सेन्सर आणि प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी सुधारत असल्याचे म्हटले आहे. २०१८पर्यंत ही चालकविरहित कार बाजारात आणण्याचे लक्ष्य चीनने ठेवले आहे.

Leave a Comment