इम्फाळच्या या बाजारात चालते फक्त महिला राज

ima
प्रत्येक क्षेत्रात पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून कार्यरत असलेल्या महिला आपण पाहतोच आहोत. भारताताले एक मार्केट मात्र फक्त महिलांच्या श्रमातूनच चालते आणि या बाजारात महिला राज आहे. हे मार्केट आहे मणिपूरच्या इंफाळ मधे महिला मार्केट. संपूर्ण आशियातले हे सर्वात मोठे महिला मार्केट मदर्स मार्केट नावानेही ओळखले जाते.या मार्केट मध्ये एकही पुरूष काम करत नाही.

mother
वुमन्स हब डॉट कॉमवर दिलेल्या माहितीप्रमाणे या मार्केट मध्ये चार हजार दुकाने आहेत. रोज हजारोंच्या संख्येने येथे ग्राहक खरेदीसाठी येतात. येथे फक्त खरेदी विक्रीच होत नाही तर सामाजिक, राजकीय व स्थानिक विषयांवरच्या चर्चाही रंगतात. स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार हे मार्केट राजकालीन आहे. तेव्हा लैलप नावाची परंपरा पाळली जात असे. त्यानुसार मैनी जमातीच्या पुरूषांना राजा दरबारात कामाच्या निमित्ताने नेहमी बोलवित असे. त्यामुळे बाकी घरदार, शेती, व्यापाराची जबाबदारी महिलांवर पडली व हाच वारसा मागच्या पिढीकडून पुढच्या पिढीकडे चालू राहिला आहे.

anipur
जगातील अन्य बाजारांप्रमाणेही या बाजाराचे कांही नियम आहेत. त्यानसार फक्त विवाहित महिलाच येथे काम करू शकतात. अन्य बाजारांचे नियम वेळोवेळी बदलतात मात्र येथील नियम अजूनतरी बदललेले नाहीत.

Leave a Comment