अॅपल विरोधात स्मार्टफोन इंडस्ट्री बॉडीची सरकारकडे तक्रार

applesamsu
सॅमसंग, पॅनासोनिक, मायक्रोमॅक्स, एलजी व इंटेक्स या व अन्य स्मार्टफोन कंपन्यांच्या इंडस्ट्री बॉडीने यंदाच्या अर्थसंकल्पात मोबाईल फोन अॅक्सेसरीज वर लावण्यात आलेली इंपोर्ट ड्यूटी कमी करावी अशी मागणी केंद्राकडे केली आहे.या आयात करामुळे अॅपल व अन्य कंपन्यांच्या तुलनेत भारतात उत्पादन करत असलेल्या कंपन्या मागे पडत असल्याचे म्हणणे मांडले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार भारतात गुंतवणूक करून ज्या स्मार्टफोन कंपन्या त्यांची उत्पादने बनवित आहेत, त्यांना त्यांच्या उत्पादनांपैकी ४० टक्के अक्सेसरीज आयात कराव्या लागतात. त्यावर सरकारने २९ टक्के कस्टम ड्यूटी लावली आहे. यात बॅटरी चार्जर, अॅडाप्टर स्पीकर, वायर्ड हँडसेट यांचा समावेश आहे. या उलट पूर्णपणे बिल्डअप युनिटवर केवळ १२.५ टक्के ड्यूटी आहे. अॅपल व कांही अन्य कंपन्या हँडसेट व अॅक्सेसरीजचे रेडी टू सेल पॅकेज आयात करतात व त्यांना १२.५ टक्के डयूडी आकारली जाते.

कंझ्युमर इलेक्ट्राॅनिकस अॅन्ड अप्लायन्सेस मॅन्युफॅक्चरिंग असो.च्या मोबाईल अॅन्ड कम्युनिकेशन कौन्सिलचे अध्यक्ष रविद्र झुत्शी म्हणाले फिनिश्ड गुडस आयात करून अॅपल अधिक फायदा कमवत आहे. त्यांनी भारतात कुठेही उत्पादन गुंतवणूक केलेली नाही. मात्र भारतात गुंतवणूक करून उत्पादन करणार्‍या कंपन्यांना २९ टक्के कर भरावा लागणार आहे परिणामी या कंपन्यांच्या नफ्यात घट होते आहे. तरी हा कर सरकारने कमी करावा अशी आमची मागणी आहे.

Leave a Comment