नामशेष होण्याच्या मार्गावर आहे उजूमुल गांव

ujmulu
तुर्कस्तानातील उजुमुल गांव हे महिला सशक्तीकरणाचे उत्तम उदाहरण म्हणता येईल. मात्र सध्या हे गांव नामशेष होण्याच्या दिशेने वेगाने प्रवास करते आहे आणि त्याला कारण आहेत महिलाच. त्यामुळे या गावातील युवकांनी गावातील मुलींविरोधात चक्क निदर्शने करायला सुरवात केली आहे. गावातील युवती गावातीलच युवकांकडून आलेले लग्नाचे अथवा प्रेमाचे प्रस्ताव ठोकरत आहेत व परिणामी गेल्या नऊ वर्षात या गावात एकही लग्न झालेले नाही. इतकेच नव्हे तर गावाची लोकसंख्याही ४०० वरून २३३ वर आली आहे. हा वेग असाच राहिला तर या गावात कुणी शिल्लक राहणार की नाही असा प्रश्न महापौरांना पडला आहे.

गावाचे महापौर मुस्तफा बेशबिलन सांगतात, आमच्या गावातील मुली स्थानिक तरूणांशी विवाहाला नकारच देत आहेत. त्यांना शहरात व गावाबाहेर जायचे आहे. आम्ही या गावात वर्षानुवर्षे राहतोय व स्थानिक रोजगारावरच आमचे आयुष्य चालले आहे. त्यामुळे येथील युवक गावाबाहेर पडून काम शोधण्याचा प्रयत्न करत नाहीत. अर्थात गावात असलेल्या उद्योगांतून कमाई फारशी होत नाही त्यामुळे अगदी चैनीत राहणे आम्हाला शक्य होत नाही व हीच बाब या मुलींना अडचणीची ठरते आहे.

अन्य शहरातील एैषारामी जीवन, मौज मजेची साधने आणि मनाजोगता पैसा खर्च करता येणे याचा गावातील मुलींना मोह पडतो आहे व त्यामुळे शहरातील युवकांना त्या पसंती देत आहेत. परिणामी गावातील लग्नायोग्य मुलांना मुली चक्क नकार देत आहेत. त्यामुळे त्रासलेल्या या तरूणांनी सरकारने याची दखल घ्यावी अशी मागणी केली आहे.

Leave a Comment