जपानी ई कॉमर्स राकुटेन भारत प्रवेशाच्या तयारीत

rakuten
जपानची अलिबाबा अशी ख्याती मिळविलेली ई कॉमर्स कंपनी राकुटेन भारतात प्रतिस्पर्धी अलिबाबाशी स्पर्धा करण्यासाठी प्रवेशास सज्ज झाली असल्याचे समजते. या कंपनीकडेच चॅट अॅप वाइबरचीही मालकी आहे.

मिळालेल्या माहितीनुसार राकुटेनने २०१४ मध्येच बंगलोर येथे विकास केंद्र सुरू केले आहे व आता बिझिनेस ऑफिसही सुरू केले जात आहे. फ्लिपकार्ट, अमेझॉन मधील मिड लेव्हल मॅनेजर्सना आपल्या कंपनीकडे आणण्याचे प्रयत्नही सुरू झाले असल्याचे सांगितले जात आहे. भारत हे वेगाने विकसित होत असलेले ई कॉमर्स मार्केट असून २०१८ पर्यंत याची उलाढाल ५५ अब्ज डॉलर्स पर्यंत जाईल असे संकेत मिळत आहेत. आशिया पॅसिफिक देशांत भारतातच ई कॉमर्स वाढीचा वेग सर्वाधिक आहे व त्याचा फायदा राकुटेनलाही मिळवायचा आहे.

राकुटेनची स्थापना १९९७ साली अर्धा डझन कर्मचार्‍यांना घेऊन झाली होती. आज या कंपनीत १२ हजार कर्मचारी आहेत आणि कंपनीची विक्री आहे ५ अब्ज डॉलर्स. जपान ई कॉमर्स व्यवसायातील १/४ हिस्सा या कंपनीचा आहे. ही कंपनी अर्थसेवा, डिजिटल कंटेंट व ट्रॅव्हल बिझिनेसमध्येही कार्यरत आहे.

Leave a Comment