आर्थिक तोटय़ाने हतबल टेलिनॉर गुंडाळणार गाशा !

telenor
नवी दिल्ली – ग्राहकांना अतिशय स्वस्तामध्ये सेवा देऊन खुश केलेली दूरसंचार कंपनी टेलिनॉर (युनिनॉर) भारतातील आपला व्यवसाय बंद करण्याचा विचार करत असून मात्र यासाठी अद्याप कोणत्याही खरेदीदाराचा शोध घेण्यात आलेला नाही.

नॉर्वेची ही कंपनी देशामध्ये ३जी अथवा ४जी सेवा देण्याच्या स्थितीत नाही. कंपनीजवळ डेटा स्पेक्ट्रम मर्यादित आहे. तसेच त्यांचा व्यवसाय काही भागांमध्ये कमी झाला आहे. प्रतिस्पर्धी कंपन्या दिवसेंदिवस मोठय़ा होत आहेत. आणि रिलायन्स जिओ इन्फोकॉम आपली सेवा लवकरच सुरू करणार आहे. त्यामुळे या स्पर्धेत टिकण्याची आशा कंपनीला नाही. परिणामी कंपनी आपला व्यवसाय बंद करण्याच्या विचारात असल्याचे कंपनीच्या प्रमुख सूत्रांनी माहिती देताना सांगितले.

सात सर्कलमधील स्पेक्ट्रम या कंपनीजवळ आहेत. मात्र देशातील २२ क्षेत्रातील केवळ सहामध्ये ही कार्यरत आहे. कंपनीकडे केवळ १८०० मेगाहर्टज बँडमध्ये ध्वनीलहरी आहेत. टेलिनॉरला आपल्या या व्यवसायाच्या माध्यमातून ११ हजार कोटी ते १२ हजार कोटी रुपये मिळण्याची शक्यता आहे. मात्र यासाठी जवळपास ६८०० कोटी रुपये किंमत मिळण्याची आशा तज्ञांनी व्यक्त केली आहे. कंपनीकडे विक्रीसाठी मुख्य स्वरुपात स्पेक्ट्रम आहेत.

Leave a Comment