लेनोवोने लॉन्च केला भन्नाट फॅबलेट

lenova
मुंबई : लॅपटॉपक्षेत्रात अग्रगण्य असलेल्या लेनोवो कंपनीने भारतीय ग्राहकांसाठी एक स्मार्टफोन-टॅब्लेट (फॅबलेट) लॉन्च केला असून फ्लिपकार्ट या ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटवर हा फॅबलेट विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. लेनोवो कंपनीने या स्मार्टफोन-टॅबमध्ये अनेक आकर्षक फीचर्स दिले असून ११ हजार ९९९ रुपयांना मिळणाऱ्या हा फॅबलेट १० ते १२ हजार रुपयांच्या दरम्यान किंमती असणाऱ्या टॅब्लेटना मोठी टक्कर देणार आहे.

फीचर्स: या फॅबलेटचा डिस्प्ले ७ इंचाचा एचडी आयपीएस असून यात अँड्रॉईड लॉलिपॉप ५.१ ऑपरेटिंग सिस्टम आणि २ जीबी रॅम तर १६ जीबीची इनबिल्ट स्टोरेज देण्यात आले आहे. ही क्षमता एसडी कार्डच्या सहाय्याने ६४ जीबीपर्यंत वाढवण्याची सुविधा देखील देण्यात आली आहे. याचा रिअर कॅमेरा १३ मेगापिक्सेलचा तर ५ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. हा फॅबलेट ४जी LTE सपोर्ट असून यात ब्लूटूथ, वाय-फाय, जीपीएस, रेडिओ, मायक्रो यूएसबी अशा कनेक्टीव्हीटी देखील देण्यात आल्या आहेत. या फॅबलेटचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे याच्या बॅटरीची क्षमता. याच्या बॅटरीची क्षमता ४२५०mAh एवढी असुन २४ तासांचे टॉकटाईम आणि २० दिवसांचे स्टँडबाय या फॅबलेटची बॅटरी देते, असा दावा लेनोवो कंपनी करते.

Leave a Comment