फीकॉमने आणला ४ हजार रुपयांत ४जी स्मार्टफोन!

phicomm
मुंबई : क्लू ६३० हा स्मार्टफोन चीनमधील स्मार्टफोन उत्पादक कंपनी फीकॉमने भारतात लॉन्च केला आहे. ४जी सपोर्ट असलेल्या स्मार्टफोनची किंमत फक्त ३ हजार ९९९ रुपये आहे. फीकॉम क्लू६३० स्मार्टफोन ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट स्नॅपडीलवर विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला आहे.

हा स्मार्टफोन १८००MHz (Band ३) आणि २३००MHz (Band४०) एलटीई बँड्सना सपोर्ट करतात. या बँड्सचा वापर भारतात ४जी सर्व्हिस देण्यासाठी वापरले जातात. त्यामुळे भारतातील ४जी सेवा देणाऱ्या कंपन्यांना फीकॉमच्या स्मार्टफोनची मोठी टक्कर असेल.

काय आहेत फीकॉम क्लू ६३०चे फीचर्स : १ GHz क्वाड-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन २१० चिपसेट प्रोसेसर, एड्रेना ३०४ जीपीयू इंटिग्रेटेड, मल्टिटास्किंगसाठी १ जीबी रॅम, ८ जीबी इनबिल्ट स्टोरेज, एसडी कार्डच्या सहाय्याने ६४जीबी स्टोरेज वाढवण्याची सुविधा, ५ मेगापिक्सेल रिअर कॅमेरा, २ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा, ४जी, ३जी सपोर्ट, जीपीआरएस, वाय-फाय, यूएसबी, ब्लूटूथ, २३००mAh बॅटरी क्षमता

Leave a Comment