फक्त महिलांच्या उपयोगाची आहेत ही अॅप्स

apps
घरदार संसार आणि भरीत भर नोकरी अशी कसरत करत असलेल्या महिलावर्गासाठी तंत्रज्ञान मदतीला धावून आले आहे. तुम्ही स्मार्टफोन वापरत असाल तर कितीतरी गोष्टी कुणाच्याही मदतीशिवाय तुम्ही लिलया पार पडू शकता ते या अॅप्सच्या सहाय्याने. अन्य कुणाची मदत सोडाच तुम्हालाही तुमचा मेंदू एखादी गोष्ट लक्षात ठेवण्यासाठी शिणवावा लागणार नाही अशा तर्हेतने ही अॅप्स तयार केली गेली आहेत. कोणती आहेत ही अॅप्स ते पाहू.

१)मायपिल अॅप – अनवॉन्टेड प्रेग्नन्सी टाळण्यासाठी अनेक महिला गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर करतात. मात्र या गोळ्या चुकून एखाद्या दिवशी घ्यायच्या राहिल्या तरी आपण गरोदर तर राहणार नाही ना याची काळजी महिलांना पोखरून काढते. ही काळजी दूर करण्यासाठी मायपिल अॅप सज्ज आहे. हे अॅप गोळी कधी, कोणत्या वेळी घ्यायची आहे याची आठवण ठेवायला मदत करते व त्यामुळे महिला निर्धास्त होऊ शकतात.

२)पिरीयड ट्रॅकर अॅप- सध्याच्या व्यग्र आणि धावपळीच्या आयुष्यात आपल्या पिरीयडची तारीख लक्षात ठेवणे अनेकदा महिलांना जिकीरीचे होते. या तारखा लक्षात ठेवणे म्हणजे मोठीच समस्या होऊ पाहते आहे. अशा वेळी पिरीयड ट्रॅकर अॅप तुमच्या मदतीस हजर आहे. याच्या सहाय्याने पिरीयड ट्रॅक ठेवता येतो व आपले अन्य कार्यक्रम आखताना पिरीयड मध्ये येत नाहीत ना अथवा येत असतील तर त्यासाठीची व्यवस्था करून ते आखणे सहज शक्य होते.

३)राईड सेफ- नोकरदार महिला असोत अथवा होममेकर महिला असोत कोणत्या ना कोणत्या कारणाने त्यांना प्रवास करावाच लागतो. कधी तो सार्वजनिक वाहनांतून करावा लागतो तर कधी कॅब, टॅक्सी, रिक्षाची मदत घ्यावी लागते. असा प्रवास वेळी अवेळी करावा लागला तर महिलांच्या सुरक्षेचा मोठाच प्रश्न निर्माण होतो. अशा वेळी महिला सुरक्षेसाठी असलेले राईड सेफ अॅप मोठेच उपयुक्त ठरते. या अॅपमुळे कोणत्याही कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही तुमचे लोकेशन, डेस्टीनेशन व अन्य डिटेल्स शेअर करू शकता. एका वेळी कितीही कॉन्टॅक्टस बरोबर ही माहिती शेअर करता येते त्यामुळे तुम्ही एकटयाने प्रवास करत असलात तरी तुमच्या संबंधितांच्या सोबत असता. कारण तुमच्या संबंधितांकडे तुम्ही कुठे आहात याची माहिती असते.

४)एव्हर नोट अॅप – कामाची यादी म्हणजे बाहेर पडले तर काय काय करायचे, काय काय आणायचे आणि घरातील कामांची यादी हा महिलांच्या आयुष्यातील रोजचाच दिनक्रम. घाईगर्दीमुळे अनेकदा सर्व गोष्टी आठवणीत ठेवणे अवघड बनते. येथे एव्हर अॅप तुमच्या मदतीसाठी येते. यात तुम्ही आपले काय प्लॅन आहेत, काय करायचे आहे, काय काय आणायचे आहे याची यादी करून ती नोंदवून ठेवू शकता.

५) रोपोसो – हे अॅपही बरेच कामाचे आहे बरं का! कारण हे अॅप तुम्हाला सर्व फॅशन अपडेटस देते. इतकेच नव्हे तर तुमच्या फॅशन आयडियाज तुम्ही अन्य मैत्रिणी , परिचितांसोबत शेअर करू शकता.

६)हेल्दी फायमी – धावपळीच्या जीवनातही फिटनेस आणि हेल्थ राखण्यासाठी हे अॅप उपयुक्त आहे.

७) बिग बास्केट अॅप – घरात लागणारे सामान त्यातही किचनसाठी लागणारे सामान आठवणीत ठेवून आणणे हे महिलांना खरोखर शिणविणारे काम आहे. याद्या करा, दुकानात जा, हव्या त्या वस्तू घासाघीस करून आणा, एके ठिकाणी मिळाल्या नाहीत तर दुसर्‍या दुकानांत जा हे सारे करायचे म्हणजे शीण येणारच. बिग बास्केट अॅप तुम्हाला या सार्याह कष्टातून मुक्ती देते. हे अॅप डाऊनलोड करून इन्स्टॉल केले की घरबसल्या किंवा ऑफिसच्या फावल्या वेळातही तुम्ही आवश्यक ते सर्व सामान ऑनलाईन नोंदणी करू शकता. हे सामान तुम्हाला तुम्ही सांगितलेल्या वेळात घरपोहोच दिले जाते. त्यात केवळ वाणसामानच नाही तर भाज्या, फळे, साबण सोडे असे सर्व गृहोपयोगी सामान मिळू शकते.

Leave a Comment