पहिली महिला बाइकर वीनू पालीवालचे निधन

veenu-paliwal
भोपाळ – सगळ्यांना आपल्या हार्ले डेविडसन बाइकच्या वेगात मागे टाकणारी पहिली महिला बाइकर वीनू पालीवालचा अपघाती मृत्यू झाला आहे. आपल्या बाइकवरून देश भ्रमंती करणारी वीनू लखनऊहून भोपाळला जात होती. तेव्हा विदिशा जिल्ह्यातील ग्यारसपुरमध्ये एका वळणावर तिचे बाइकवरील नियंत्रण सुटले आणि ती खाली पडली. त्यावेळी वीनूच्या बाइकचा स्पीड इतका अधिक होता की तिला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर तिला जिल्ह्यातील रूग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
veenu-paliwal1
मिळालेल्या माहितीनुसार, वीनू यंदा ज्या प्रवासाला निघाली होती तो प्रवास अगदी खास होता. ती आपल्या बाइक प्रेमावर एक चित्रपट तयार करू इच्छित होती. वीनू कायम १८० किमी स्पीडने बाइक चालवत असे. राइडिंग करताना वीनू अनेकदा भारतात बरेच काही बघण्यासारखे असल्याचा संदेश देत असे. फक्त मुंबईत गरिबी नसून भारतात खूप काही पाहण्यासारखे आहे. असे देखील ती सांगत असे. वीनूच्या इंडिया या चित्रपटाचे शूटिंग आता सुरू असून हा चित्रपट काही महिन्यातच तयार होणार होता. जयपूरची वीनू पालीवाल आपले जीवन अगदी आनंदात आणि एक रोमांच पूर्व घालवत असे. गेल्यावर्षी वीनूने हार्ले डेविडसन ४८ मॉडेल सोबत हॉगची रॅली पूर्ण केली होती. तिला लेडी ऑफ द हार्ले हा पुरस्कार २०१६ मध्ये देण्यात आला होता.

Leave a Comment