अहमदाबाद – दिग्गज ई-कॉमर्स कंपनी स्नॅपडील आता फोन नव्हे तर अन्य वस्तूंची डिलिव्हरी चार तासांच्या आतमध्ये करणार असून चार तासांच्या आतमध्ये वस्तूंची डिलिव्हरी करण्यासाठी योग्य ती व्यवस्था करण्यात येणार असल्याने कंपनीच्या व्यवस्थापकांनी माहिती देताना सांगितले आहे. कमीत कमी वेळेमध्ये सेवा देण्यामुळे ग्राहकांचा वाढता प्रतिसाद मिळण्याची आशा कंपनीला आहे.
आता स्नॅपडील करणार फक्त चार तासात डिलिव्हरी
यापूर्वी आम्ही आमच्या डिलिव्हरी सेवेत मागील वर्षाच्या तुलनेत ७० टक्क्यांनी सुधारणा केली आहे. आता फोन लाँन्चिगसह अन्य उत्पादने देण्यासाठी याचा वापर करण्यात येणार आहे. स्नॅपडीलने मागील सहा महिन्यामध्ये जवळपास ४०टक्के ऑर्डर्स त्याच दिवशी अथवा दुस-या दिवशी ग्राहकांना पोच केल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने मोबाईल फोन आणि अन्य गरजेच्या उत्पादनांचा समावेश आहे, असे कंपनीचे अध्यक्ष आशिष चित्रवंशी यांनी म्हटले आहे.
स्नॅपडीलला मिळणा-या ऑर्डर्सपैकी जवळपास ९९ टक्के ऑर्डर्स त्याच दिवशी वितरीत करण्यात येतात. यासाठी कंपनीने वितरण व्यवस्था भक्कम केली असून, २०० मिलियन डॉलर्सची मोठी गुंतवणूक केली आहे. कंपनीने २० लाख चौरस फुटाचे गोदाम तयार केले आहे.