अवघ्या ९९९ रुपयाच्या मासिक हफ्त्यात मिळणार आयफोन!

iphone
मुंबई: जगभर स्मार्टफोनसाठी प्रसिद्ध असलेल्या अॅपलने आता आपले लक्ष भारतीय बाजारपेठेकडे वळवल्यामुळेच काही दिवसांपूर्वीच आयफोन SE हा स्वस्त स्मार्टफोन लाँच केला होता. आता हाच स्मार्टफोन ९९९ रुपयांच्या मासिक हफ्त्यावरही मिळणार आहे. हा स्मार्टफोन दोन वर्षापर्यंत ९९९ रुपयांच्या हप्त्यांवर खरेदी करता येणार आहे.

अॅपलने याआधी आयफोन ६ आणि आयफोन ६एस साठी लीजिंग प्लान आणला होता. या प्लाननुसार, आयफोन ६साठी दोन वर्ष ११९९ रु. ईएमआय आणि आयफोन ६एससाठी दोन वर्ष १३९९ ईएमआय असणार आहे. कंपनीने आयपॅड मॉडेल्सवरही ऑफर सुरु आहेत. यंदा अॅपलने ईएमआयवर स्मार्टफोन विक्रीवर जोर दिला आहे. ८ एप्रिलला भारतात लाँच करण्यात आलेल्या आयफोन SE बाबत मार्केटमध्ये म्हणावा तसा उत्साह पाहायला मिळाला नाही. यासाठीच ही नवी ऑफर आणल्याचे वृत्त आहे.

Leave a Comment