युगप्रवर्तक महात्मा जोतिबा फुले यांना अभिवादन..!

mahatma
मुंबई – भारतीय समाजात शिक्षणाचे महत्व रुजवणारे क्रांतीकारी महात्मा जोतिबा फुले यांची आज जयंती आहे. देशामध्ये स्त्री शिक्षणाचा पाया त्यांनी घातला. त्यांच्याच शब्दात शिक्षणाचे महत्वा सांगायचे झाले तर…

विद्येविना मती गेली। मतिविना नीती गेली।
नीतिविना गती गेली। गतिविना वित्त गेले।
वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले।।

वरील चार वाक्यात शिक्षणाचे महत्व सांगणारे जोतीराव फुले यांच्या १८९ व्या जयंतीनिमीत्त त्यांना माझा पेपर तर्फे विनम्र अभिवादन. ब्रिटीश राजवटीमध्ये स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभागी होऊन एकीकडे त्यांनी ब्रिटीश साम्राज्याला विरोध केला. त्याचवेळी शिक्षणाचे महत्व ओळखून महिलांसह सर्वांना शिक्षणाचा अधिकार मिळावा यासाठी त्यांनी जिवाचे रान केले. सर्वप्रथम आपली पत्नी सावित्रीबाई फुले यांना त्यांनी शिकवले आणि त्यांच्या मदतीने महिलांना शिक्षणाची कवाडे खुली केली. त्यांच्या कार्याचा गौरव आजही देशभरात करण्यात येतो. महात्मा फुले यांच्या जयंती निमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे.

Leave a Comment