ब्लॅकबेरी लवकरच लाँच करणार दोन नवे बजेट स्मार्टफोन

blackberry
मुंबई: दोन नवे मिडरेंज स्मार्टफोन ब्लॅकबेरी लाँच करणार असून याबाबत एका मुलाखतीत याची घोषणा कंपनीचे सीईओ जॉन चेन यांनी केली. पण या फोनचे नेमके कधी लाँचिंग करण्यात येईल याविषयी माहिती देण्यात आली नाही.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, एक फूल टच स्क्रिन आणि दुसरा स्मार्टफोन क्वेटी की बोर्ड असणार आहे. दोन्ही स्मार्टफोनची किंमत २०,००० रु आणि २६,००० रुपये असण्याची शक्यता आहे. चेन प्रीमियम अँड्रॉईड स्मार्टफोन प्रिवविषयी बोलताना म्हणाले की, हे कंपनीचे हाय-एंड डिव्हाइस आहे. ज्याच्या किंमतीत कपात करण्यात आली आहे.

मागील तीन महिन्यात प्रीमियम अँड्रॉईड स्मार्टफोन प्रिव ६००,००० युनिटची विक्री करण्यात आली आहे. ब्लॅकबेरी प्रिवमध्ये ५.४ इंच १४४०×२५६० पिक्सल रेझ्युलेशन डिस्प्ले आहे. हेक्सा-कोअर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८०८ प्रोसेसर, ३ जीबी रॅम ३२ जीबी इनबिल्ट स्टोरेज आहे. १८ मेगापिक्सल रिअर कॅमेरा, २ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. ऑपरेटिंग सिस्टम अँड्रॉईड ५.१ लॉलीपॉप आणि ३जी, वायफाय आणि इतर कनेक्टिव्हीटी फीचर यात देण्यात आले आहेत.

Leave a Comment