देशात महाबँक स्थापनेची प्रक्रिया सुरू

banks
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची दशा व दिशा निश्चित करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या बँक बोर्ड ब्युरो (बीबीबी) ची पहिली बैठक मुंबईत रिझर्व्ह बँकेच्या मुख्यालयात नुकतीच पार पडली. यात सार्वजनिक क्षेत्रातील २२ बँकांची संख्या कमी करून त्याऐवजी ६ किवा ७ महाबँका निर्माण करण्याच्या प्रक्रियेबाबत विस्ताराने चर्चा झाली असल्याचे समजते. या बैठकीत बीबीबीचे प्रमुख विनोद राय केंद्रीय अर्थराज्य मंत्री जयंत सिन्हा तसेच रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर रघुराम राजन व उपगर्व्हनर एस,एस.मुंद्रा सहभागी झाले होते.

केंद्रीय अर्थममंत्री अरूण जेटली यांनी अर्थसंकल्पात महाबँक स्थापनेची प्रक्रिया अधिक लांबणीवर टाकली जाणार नसल्याचे स्पष्ट केले होते मात्र बँकांकडून या योजनेला कोणताच प्रतिसाद दिला गेलेला नाही. त्यामुळे हे काम पुढे नेण्याची जबाबदारी बीबीबीवर सोपविली गेली आहे. त्यासाठी बीबीबने रोड मॅप तयार करून या कामासाठी लागणारा कालावधी निश्चित करावयाचा आहे असे समजते.

Leave a Comment