९ हजारांनी स्वस्त झाला सॅमसंग गॅलक्सी नोट ५

samsung
मुंबई: मागील वर्षी सॅमसंगने लाँच केलेला आपला शानदार स्मार्टफोन गॅलक्सी नोट ५च्या किंमतीत भरघोस कपात केली असून आता ३२ जीबी आणि ६४ जीबी व्हेरिएंटमध्ये मिळणारे हे मॉडेलच्या किंमतीत तब्बल ९००० हजारांची कपात करण्यात आली आहे. आता ३२ जीबी मॉडेल रु. ४२,९०० आणि ६४ जीबी मॉडेल ४८,९०० रुपयात खरेदी करता येणार आहे.

सॅमसंगच्या ऑनलाइन स्टोअरमध्ये किंमतीतील ही कपात करण्यात आली आहे. ज्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकतो. या स्मार्टफोनमध्ये १४४०×२५६० पिक्सल ५.७ इंच क्यूएचडी सुपर-एमोल्ड डिस्प्ले आहे. तसेच यामध्ये ऑक्टा-कोअर एकस्योनस् ७४२० प्रोसेसरही आहे. फोर कोरटेक्स-ए५७ कोर्स २.१GHz आणि फोर कोरटेक्स- ए५३ १.५GHz सोबत येणार आहे.

दोन मेमरी वेरिएंटमध्ये हा स्मार्टफोन उपलब्ध आहे. ३२ जीबी आणि ६४ जीबी. यामध्ये मात्र मायक्रो एसडी कार्ड ऑप्शन देण्यात आलेला नाही. तसेच यामध्ये ४ जीबी रॅम देण्यात आला आहे. कंपनी सीईओच्या मते, सॅमसंगच्या आजवरच्या स्मार्टफोनपैकी हा सर्वाधिक रॅम असणारा स्मार्टफोन आहे. सॅमसंग गॅलक्सी नोट ५ मध्ये १६ मेगापिक्सल रिअर कॅमेरा असून यात ५ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे. तसेच यामध्ये ३०००mAh बॅटरी क्षमता आहे. ४जी, ब्ल्यूटूथ, वाय-फाय हे ऑप्शनही देण्यात आले आहेत.

Leave a Comment