सिंहस्थ; प्रज्वलीत झाली १२१ फुटांची अगरबत्ती

agarbatti
उज्जैन : रविवारी संध्याकाळी ५ हजार किलो द्रव्यापासून तयार केली गेलेली १२१ फुटाच्या अगरबत्तीचे प्रज्ज्वलन करण्यात आल्यामुळे हा संपूर्ण विभाग सुंगधाने व्यापून गेला आहे. ही अगरबत्ती गाईचे शेण, गोमूत्र, चंदन, गंगा जल, हिमालयातील २७ औषधी वनस्पतींपासून तयार करण्यात आली आहे. त्याचबरोबर ही अगरबत्ती बनवण्यात आली आहे.

ही अगरबत्ती संपूर्ण सिंहस्थापर्यंत प्रज्वलीत राहणार असून यावेळी गोमातेला राष्ट्रीय पशु घोषित करण्याची मागणी करण्यात आली. यावेळेस ८ क्विंटलच्या बेसनचे लाडू देखील प्रसाद म्हणून वाटण्यात आले.

Leave a Comment