वर्षभरात एक लाख पंचायती होणार ‘वाय फाय’

BSNL
नवी दिल्ली: केंद्र शासनाची ग्रामीण ब्रॉडबँड योजना दीर्घकाळ प्रलंबित राहिली असल्याने ‘बीएसएनएल’ने वायफायद्वारे खेडेगावांमध्ये वेगवान इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पर्यायी योजना सरकारला सदर केली असून प्रायोगिक तत्वावर त्याची चाचणी राजस्थानातील तीन गावांमध्ये सुरू आहे. या योजनेला मान्यता मिळाल्यास एक वर्षात एक लाख गावांना पंचायतीद्वारे ‘वायफाय’ सुविधा देण्यात येईल.

जुन्या योजनेप्रमाणे फायबरचे जाळे पसरवून ग्रामीण भागात इंटरनेट सुविधा पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाणार होता. मात्र त्यासाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ आवश्यक असल्याने या योजनेला गती मिळू शकली नाही. त्यामुळे ‘वायफाय’द्वारे पंचायातींना ‘ब्रॉडबँड’ सुविधा उपलब्ध करून देण्याच्या तंत्रज्ञानाची चाचणी ‘बीएसएनएल’ने सुरू केली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी ‘बीएसएनएल’ने केंद्राकडे निधीची मागणी केली आहे.

केंद्रात मी २०१४ मध्ये सत्तेवर आलेल्या भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने मार्च २०१५ अखेर ५० हजार, मार्च २०१६ पर्यंत १ लाख आणि डिसेंबर २०१६ पर्यंत इतर सर्व गावांपर्यंत वेगवान इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देण्याची योजना आखली होती. मात्र या पैकी कोणतेच लक्ष्य गाठणे शक्य झालेले नाही. मात्र ‘बीएसएनएल’ने सादर केलेल्या नव्या योजनेनुसार सन २०१८ पर्यंत देशभरातील सर्व गावांना वेगवान इंटरनेट सुविधा पुरविण्यात येणार आहे.

Leave a Comment