भारतात सर्वाधिक वाघांची संख्या

tiger
नवी दिल्ली – शतकामध्ये पहिल्यांदाच वाघांची संख्या जगभरात करण्यात आलेल्या व्याघ्रगणनेत वाढली आहे. ही व्याघ्रगणना रशियापासून ते व्हिएतनामच्या जंगलामध्ये करण्यात आली असून यात वाघांची संख्या ३८९० वर पोहोचली आहे. व्याघ्रगणनेत संवर्धन गट आणि प्रत्येक देशाच्या सरकारने सहभाग घेतला होता आणि त्याच आधारे ही आकडेवारी समोर आल्याची माहिती वन्यजीन संवर्धन गटाने दिली आहे.

२०१०मध्ये करण्यात आलेल्या व्याघ्रगणनेत वाघांची संख्या ३२०० होती आणि यात विशेषबाब म्हणजे वाघांची संख्या वाढण्यामध्ये भारताचे खूप मोठे योगदान असून भारतामध्येच अर्ध्यापेक्षा जास्त वाघ आहेत. भारताच्या जंगलांमधील वाघांची संख्या एकूण २२२६ इतकी आहे. या सर्वेक्षणामुळे पहिल्यांदाच वाघांची संख्या वाढल्याचे समोर आले आहे.

Leave a Comment