फियाटची २०१७ स्पायडर टू सीटर कार

spider
फियाटच्या सर्वात आकर्षक कारमधील एक मानली जाणारी २०१७ फियाट १२४ स्पायडर ही टू सीटर कार इटालियन स्टाईल व मॉडर्न टेक्नॉलॉजी यांचा अनोखा मिलाफ म्हणता येईल. ज्यांना क्लासिक लूकच्या कार अधिक पसंत आहेत, त्या ग्राहकांना ही कार नक्कीच आकर्षित करेल असा कंपनीचा दावा आहे. फियाटचे या लाईनअप मध्ये तीन कार सादर केल्या असून त्यातील रोडस्टर ही सर्वात नवी आहे. क्लासिका व लुसो या अन्य दोन कार आहेत.

या कारसाठी १.४ लिटरचे मल्टीएअर टर्बो इंजिन, ६ स्पीड मॅन्युअल व अॅटोमॅटिक ट्रान्समिशन दिले गले आहे. क्लासिकामध्ये इलेक्ट्रीक पॉवर स्टीअरिंग इंडिपेंडंड फ्रंट एअर रिअर सस्पेन्शन व इलेक्ट्राॅनिक स्टॅबिलीटी फिचर्स दिली गेली आहेत. अर्थात प्रत्येक मॉडेलची खासियत वेगवेगळी आहे. कारमधून प्रवास करणार्‍यांसाठी मनोरंजनाची पूर्ण व्यवस्था आहे. फियाट कनेक्ट ७.० सह ७ इंची फुल कलर टचस्क्रीन डिस्प्ले, एफएम रेडिओ सहा स्पीकर्स, १ एसडी कार्ड रिडर, मल्टीमिडीया कंट्राल नॉबही दिला गेला आहे.

Leave a Comment