डेटाविंडने लॉन्च केला स्वस्त आणि मस्त टॅब्लेट !

datawind
नवी दिल्ली : टेक्नोसॅव्हींसाठी एक खास टॅब्लेट स्वस्त आणि मस्त स्मार्टफोन, लॅपटॉप बनवणारी कंपनी म्हणून प्रसिद्ध असलेल्या डेटाविंड कंपनीने बाजारात आणला आहे. डेटाविंडने ५ हजार ९९९ रुपये एवढ्या कमी किंमतीत टॅब्लेट उपलब्ध करुन दिला आहे. आय३जी७ असे या टॅब्लेट पीसीचे नाव असून या टॅब्लेटमध्ये अनलिमिटेड इंटरनेट ब्राऊजिंग अॅक्सेस दिला आहे.

याबाबत माहिती देताना डेटाविंड कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनीत सिंह तुली म्हणाले, डेटाविंड कंपनी नव्या टॅब्लेटच्या माध्यमातून ग्राहकांना टेकनिक आणि स्टायलिश डिव्हाईस देत आहे आणि तेही स्वस्त दरात. देशातील अधिकाधिक लोकांना डिजिटल युगात आणण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल आहे.

टॅब्लेट पीसी आय३जी७मध्ये ८ जीबीचे इन-बिल्ट स्टोरेज असेल. मात्र, मायक्रो एसडी कार्डच्या सहाय्याने स्टोरेज ३२ जीबीपर्यंत वाढवण्याची सोय करण्यात आली आहे. ७ इंचाच्या टॅब्लेटमध्ये इंटेलचा प्रोसेसर देण्यात आले आहे. यामध्ये अँड्रॉईड लॉलिपॉप ५.१ ऑपरेटिंग सिस्टम असून वाय-फाय, ब्लूटूथ आणि मायक्रो-यूएसबी कनेक्टिव्हिटी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे एवढ्या कमी किंमतीतील टॅब्लेटला ३जी सपोर्टही आहे. या टॅब्लेटमध्ये २८०० mAh क्षमतेची बॅटरी असून टॉक टाईम ४ तासांपर्यंत आणि स्टँडबाय टाईम पाच दिवसांपर्यंत असेल. यामध्ये एचडी प्लेबॅकचे फीचरही आहे.

Leave a Comment