अवघ्या ९ वर्षाची मुलगी चालवते वृत्तपत्र

news-paper
पेन्सिलवेनिया : अमेरिकेतील पेन्सिलवेनियामध्ये अवघ्या ९ वर्षांची हिल्दे केट लिसियाक वृत्तपत्र प्रकाशित करते. आणि आपल्या बातम्या हिल्दे घटनास्थळी जाऊन मिळवते. एका घटनास्थळी हिल्देने जाऊन हत्या प्रकरणाचा रिपोर्ट तयार केला, त्याचा फोटो व्हि़डीओ घेतला, पोलिसांकडून माहिती मिळवली आणि आपल्या सोशल मीडिया पेजवर आणि वेबसाईटवर ते प्रकाशित केले. ती घटनास्थळी पोहोचली तेव्हा इतर पत्रकार नव्हते. पोलीसही तीने विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. हिल्देला सर्व काम स्वत: करायला आवडतं, तिला इतरांची मदत घेणे आवडत नाही. हिल्दे अमेरिकेत लोकप्रिय झाली आहे. जगभरातील मोठ-मोठे वर्तमानपत्र तिची मुलाखत छापत आहेत. ते एक छोटे वर्तमानपत्र देखील चालवते. तिच्या वृत्तपत्राचे नाव ऑरेंज स्ट्रीट न्यूज असे आहे.
news-paper1

Leave a Comment