सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ६ टक्क्यांनी वाढ

notes
नवी दिल्ली – केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवून केंद्र सरकारने सर्व कर्मचाऱ्यांना नवीन वर्षाची भेट दिली आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मागील महिन्यात महागाई भत्ता वाढीबाबत घोषणा केली होती. हा महागाई भत्ता आता १ जानेवारी २०१६ पासून लागू होणार असल्याचे अर्थमंत्रालयाने जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे. या परिपत्रकानुसार महागाई भत्ता ११९ टक्क्यावरून १२५ टक्क्यापर्यंत वाढविण्यात येणार आहे.

सुमारे ५० लाख केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना आणि ५८ लाख भविष्य निर्वाह निधी धारकांना या वाढीव महागाई भत्त्याचा लाभ होणार आहे. मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात ११३ टक्क्यावरून ११९ टक्क्यापर्यंत महागाई भत्ता वाढविण्यात आला होता.

Leave a Comment