भारतामध्ये सुरू झाली आयफोन एसईची विक्री

iphone
नवी दिल्ली – भारतामध्ये विक्रीसाठी प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी अॅपलचा आयफोन एसई उपलब्ध झाला आहे. मागील महिन्यात अॅपलने आपल्या मुख्यालयात आयोजित केलेल्या एका कार्यक्रमामध्ये दोन आयफोन एसई आणि आयपॅड प्रोचे अनावरण केले होते. या स्मार्टफानच्या दाखल करण्यामुळे अनेक अॅपलच्या चाहत्यांना स्मार्टफोन खरेदीची संधी मिळणार आहे.

आयफोन एसई आणि ९.७ इंच आयपॅड प्रो कंपनीच्या वेबसाईट आणि कंपनीच्या किरकोळ विक्रेत्यांकडे उपलब्ध करण्यात आला आहे. भारतामध्ये आयफोन एसई ३२ जीबी आणि ६४ जीबीच्या दोन प्रकारामध्ये उपलब्ध करण्यात आला आहे. भारतामध्ये ३२ जीबी स्टोअरेजच्या आयफोनची किंमत ३९ हजार असून, ६४ जीबीच्या आयफोनची किंमत ४९ हजार ठेवण्यात आली आहे.

अनेक वैशिष्टय़ांचा अॅपलच्या आयफोन एसईमध्ये समावेश करण्यात आला आहे. यामध्ये ४ इंच रेटिना डिस्प्ले, अॅपल ए९ प्रोसेसर, एम९ को-प्रोसेसर, २ जीबी रॅम देण्यात आले आहेत. आयफोन एसई आय ओ एस ९.३ सोबत आऊट ऑफ बॉक्स देण्यात येत आहे. हँडसेटमध्ये १२ मेगापिक्सलचा आयसाइट कॅमेरा आणि रेटिना फ्लॅश फिचर्ससह १.२ मेगापिक्सलचा फेसटाइम कॅमेरा देण्यात आला आहे.

Leave a Comment