भारतात आला शेवटचा लूमिया ६५०

lumia
मायक्रोसॉफ्टने त्यांच्या विंडोज १० वर आधारित असलेला मिड बजेट स्मार्टफोन लूमिया ६५० भारतात आणला असून हा लूमियाचा शेवटचाच स्मार्टफोन असल्याचे म्हटले जात आहे. मायक्रोसॉफट सरफेस फोन नावाच्या डिव्हायसेसवर काम करत असल्याने यापुढे लूमिया डिव्हायसेस न बनविण्याचा निर्णय कंपनीने घेतला असल्याचे सांगितले जात आहे.

लूमिया ६५० साठी ५ इंची एचडी एमोलेड किलअरबॅक डिस्प्ले, १ जीबी रॅम, १६ जीबी इंटरनल मेमरी, मायक्रो कार्डच्या सहाय्याने ती २०० जीबी पर्यंत वाढविता येण्याची सुविधा, ८ एमपीचा रियर एलईडी फ्लॅशसह कॅमेरा तर सेल्फीसाठी ५ एमपीचा फ्रंट कॅमेरा अशी फिचर्स आहेत. कनेक्टीव्हिटीसाठी फोरजी ,थ्रीजी, वायफाय, ब्ल्यू टूथ, जीपीएस अशी ऑप्शन्स आहेत. अॅमेझॉनवर हा फोन १५२९९ रूपयांत उपलब्ध करून दिला गेला आहे.

Leave a Comment