पॅनासोनिकने लाँच केला फिंगरप्रिंट स्कॅनरवाला एलुगा आर्क

panasonic
नवी दिल्ली : भारतात आपला नवीन स्मार्टफोन एलुगा आर्क पॅनासोनिकने लाँच केला आहे. १२,४९० रूपये इतकी या स्मार्टफोनची किंमत आहे. या फोनचे वैशिष्टय़ म्हणजे यामध्ये देण्यात आलेले फिंगरप्रिंट स्कॅनर आणि २.५D कर्व्हड डिस्प्ले.

४.७ इंच एचडी आयपीएस डीस्प्ले असलेल्या या स्मार्टफोनमध्ये १.२ gHtz कॉलकॉम स्नॅपड्रगन ४१० प्रोसेसर आहे. २ जीबी रॅम असलेल्या या फोनमध्ये ३२ जीबी इंटर्नल मेमरी देण्यात आली असून ती मायक्रो एसडी कार्डद्वारे वाढवता येते. या स्मार्टफोनमध्ये अँड्रॉईड ५.१ लॉलिपॉप ऑपरेटिंग सिस्टीम देण्यात आली आहे. दोन सिमकार्डला सपोर्ट करणा-या या स्मार्टफोनमध्ये एलईडी फ्लॅशसह ८ मेगापिक्सलचा रिअर आणि ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

एलुगा आर्क हा ४जी स्मार्टफोन असून वायफाय, ब्ल्युटूथ आणि जीपीएस कनेक्टिव्हीटी देखील यामध्ये देण्यात आली आहे. या फोनमध्ये १८०० mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली असून त्यात क्वीक चार्ज प्रणालीही देण्यात आली आहे. त्यामुळे या फोनची बॅटरी इतर स्मार्टफोनपेक्षा लवकर चार्ज होणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

Leave a Comment