पत्नीच्या भीतीने करोडपती राहतोय घराच्या बागेत

sharafat
टेक्सास येथील लेक व्हॅलीतील आलिशान बंगल्यासह कोट्यावधींची संपत्ती असलेला एक करोडपती गेले सहा महिने पत्नीच्या भीतीने घराच्या बागेत मुक्काम करून राहिला आहे. शराफत खान असे या कोट्याधीशाचे नांव आहे. त्याच्याजवळ कपड्याचा एक जोड आहे पण पायात बूट चप्पल कांही नाही. त्याच्या या परिस्थितीवर न्यायालयाकडूनही त्याला कोणताही दिलासा मिळालेला नाहीच उलट घराच्या बागेतूनही बाहेर निघा असाच निकाल न्यायालयाने दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार शराफत याची बायको डॉक्टर आहे. शराफतखान तिला नेहमी मारहाण करत असे व त्या दोघांत नेहमीच भांडणे होत असल्याने शराफतच्या बायकोने न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने बायकोचे म्हणणे ग्राह्य धरून बंगल्याची मालकी बायकोकडे दिली. त्यानंतर बायकोने त्याला घरात येता येऊ नये म्हणून दरवाज्यांची सर्व कुलुपे बदलून टाकली. परिणामी अंगावरच्या कपड्यांनिशीच शराफतला घराबाहेर व्हावे लागले आहे. त्यांचे शेजारी त्याला खाण्यापिण्याची मदत करताहेत.नातेवाईक व मित्रांनीही त्याला मदतीचा हात देऊ केला आहे मात्र शराफतने ही मदत नाकारली आहे.

शराफतखान यांना ३० वर्षाचा एक मुलगाही आहे. मात्र हा मुलगाही आईच्या बाजूने आहे. तो सांगतो, आई वडीलांच्यात सतत भांडणे होतात व वडील आईला मारहाण करतात. त्यामुळे यापूर्वीही एकदा शराफतखानला तुरूंगाची वारी करावी लागली आहे.

Leave a Comment