मध्यप्रदेशातील प्रसिद्ध पन्ना जिल्ह्यातील हिरा खाणींचे लिलाव करण्यात येणार असून त्यासाठीच्या निविदा मागविण्याची नोटीस जारी केली गेली आहे. देशात प्रथमच हिरे खाणींचे लिलाव केले जाणार आहेत. खाण उत्पादन मंत्रालयाचे सचिव बलविंदरकुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील महिन्यात हे लिलाव केले जातील. निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ३ आठवड्यांचा कालावधी लांगणार आहे.
देशात प्रथमच होणार हिरा खाणींचे लिलाव
सध्या देशात सार्वजनिक क्षेत्रातील नॅशनल माईन्स डेव्हलपमेंट कार्पोरेशन (एनएमडीसी) हे एकमेव संघटीत क्षेत्रातील हिरा उत्पादक आहेत. पन्ना येथील मझगावन खाण या कंपनीकडे असून तेथे दरवर्षी ८१ हजार कॅरेट हिरे उत्पादन होते. शिवाय पन्ना व सतना येथील कमी खोलीच्या खाणीतून ४०० कॅरेटचे उत्पादन होते. मध्यप्रदेशात सुमारे १०,४५००० कॅरट हिरे साठे आहेत असेही समजते.