आपला स्मार्टफोन हॅक होण्यापासून असे वाचवा

smartphone
एसएमएस द्वारा येणारे अॅप्स डाऊनलोड करू नका. यामुळे आपला डिव्हाईसला व्हायरस जडू शकतो. वेळोवेळी स्मार्टफोनचे सॉफ्टवेअर अपडेट करा. कंपन्या अपडेट व्हर्जनमुळे हॅकर्सपासून डिव्हाइसला वाचवण्याचे काम करते. स्मार्टफोनला नेहमी पासवर्ड टाकून सुरक्षित ठेवा. ज्यामुळे आपला मोबाईल हॅक होण्यापासून किंवा आपल्या परवानगी विना स्मार्टफोन वापराची शक्यता १०० टक्क्यांनी कमी होते. एसएमएस किंवा ईमेल द्वारा आलेले अज्ञात वेबसाइट लिंक्स खोलू नका. सार्वजनिक स्थळी जास्त करून आपले ब्लूटूथ बंद ठेवा.

स्मार्टफोन सुरक्षित ठेवणारी काही अॅप्स

लास्टपास – हे एक पासवर्ड मॅनेजर अॅप आहे, ज्यामुळे आपण आपले ईमेलचे पासवर्ड देखील सुरक्षित ठेवू शकता. स्मार्टफोनवर कोणतीही वेबसाइट खोलताच हे अॅप स्वतःहून आपला ईमेल आणि पासवर्ड टाकतो. या अॅपची साईज डिव्हाइसच्यानुसार उपलब्ध आहे.

कीपर – या पासवर्ड मॅनेजर अॅपला खासकरून आयफोनसाठी बनविण्यात आले आहे. या अॅपमुळे पासवर्डसोबतच फाइल, फोटो आणि व्हिडीओ सुरक्षित ठेवू शकता. या अॅपसोबत आपण अॅपल वॉचचा देखील वापर करू शकता. या अॅपची साईज ३७.७एमबी एवढी आहे.

परफेक्ट अॅपलॉक – या अॅपमुळे आपण स्मार्टफोन पर व्हॉटस्अॅप, ईमेल, कॅमरा आणि फोटो गॅलरीला सुरक्षित ठेवू शकता. साधारण अॅपप्रमाणेच चुकीचा पासवर्ड टाकल्यावर अॅप स्वतःहून यूजरचा फोटो काढतो. या अॅपची साईज ६.९एमबी एवढी आहे.

Leave a Comment