स्टेट बँक, आयसीआयसीआयचे गृह कर्ज स्वस्त झाले

home-loan
मुंबई : भारतीय स्टेट बँक आणि आयसीआयसीआय या दोन बॅंकांनी आपल्या गृहकर्जात कपात केली आहे. त्यामुळे आता सामान्यांना घर घेणे शक्य होणार आहे.

स्टेट बँकेने आपल्या गृहकर्जात मोठी कपात केली आहे. आता ९.४५ टक्के तर महिलांसाठी हाच व्याज दर ९.४ टक्के आहे. रिझर्व्ह बँकेने ०.२५ टक्के रेपो दरात कपात केली होती. त्यामुळे बँकांनीही कर्ज दरात कपात करण्याचा निर्णय घेतला. ही कर्ज कपात एप्रिलपासून लागू होणार आहे. याआधी स्टेट बँकेत होम लोन ९.५५ टक्के होते. तर महिलांसाठी ९.५ टक्के होते.

स्टेट बँकेनंतर आयसीआयसीआय बँकेनेही कर्ज दरात कपात केली आहे. गृह कर्जावर ०.१० टक्के कपात केली असून ९.४ टक्के व्याज दर केला आहे. तर महिला खरीदीदारांसाठी फ्लोटिंग दर लागू केला. ५ कोटी रुपये पेक्षा जास्त कर्ज घेणाऱ्यांसाठी ९.६५ टक्के तर २५ लाख रुपयांपर्यंत गृह कर्ज घेणाऱ्यांसाठी ९.४० टक्के दर असणार आहे.

Leave a Comment