देशातील ५८५ मंडई ई-ट्रेडिंगशी जोडणार

radhamohan-singh
लाडवा (हरियाणा) : केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग यांनी देशातील ५८५ मंडई ई-ट्रेडिंगशी जोडणार असल्याची घोषणा केली आहे. याबरोबरच फळे आणि भाजीपाल्यांच्या उत्कृष्ट केंद्राचे व्यावसायिकरण करण्याची योजनाही तयार करण्यात आली आहे. या माध्यमातून शेतक-यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल. या योजनेचा शुभारंभ १४ एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यामध्ये हरियाणाच्या मंडईचा समावेश करण्यात येणार आहे. याबरोबरच कमी पाण्यात अधिक सिंचन वाढविण्यावरही भर दिला जाणार आहे.

भारत-इस्रायलच्या संयुक्त योजनेतून एकीकृत विकास बागवानी मिशनअंतर्गत उभारण्यात आलेल्या उष्णकटिबंधीय फळ केंद्राचे उद्घाटन केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. मे २००६ मध्ये भारत-इस्रायल योजनेअंतर्गत उत्कृष्ट फळ केंद्र सुरू करण्याचा करार झाला होता. भारतीय कृषि विकासासाठी इस्रायली तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा विचार सुरू आहे. भारतात इस्रायली तंत्रज्ञानाचा वापर करून बागवानी क्षेत्राचा विकास केला जाईल.

या योजनेअंतर्गत आतापर्यंत २६ उत्कृष्ट केंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे. यात पहिल्या दोन टप्प्यांत १० उत्कृष्ट केंद्रांचे काम झालेले आहे. तब्बल ९ कोटी १० लाख रुपये खर्चून उभारण्यात आलेले उपउष्णकटिबंधीय फळ केंद्राचे कृषिमंत्री राधामोहन सिंग आणि हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी बागवानी क्षेत्र आणि नर्सरीचीही माहिती घेण्यात आली. यावेळी इस्रायलचे प्रतिनिधीही उपस्थित होते.

Leave a Comment