२३ वर्षीय भारतीयाच्या प्रेमात पडली ४१ वर्षीय अमेरिकेन महिला

couple
मुंबई: भारतीय तरूणांच्या प्रेमात अनेक परदेशी महिला पडल्याच्या घटना आपण ऎकल्या असतील. पुन्हा एकदा अशीच घटना घडली असून अहमदाबादमधील एका गरिब २३ वर्षीय मुलाच्या प्रेमात अमेरिकेतील ४१ वर्षीय महिला पडल्याची घटना घडली आहे. या दोघांनी नुकताच विवाह केला आहे.

या अमेरिकेन महिलेचे नाव टेमीली असे असून हितेश त्या तरूणाचे नाव आहे. टेमीलीने अहमदाबाद येथील चोटिला मंदिरात हितेश सोबत लग्न केले. त्यानंतर त्यांनी कोर्ट मॅरेजही केले. हितेश आणि टेमीली दोघेही ऎकमेकांना ओळखत नव्हते. हितेशला धड इंग्रजीही बोलता येत नव्हते. त्यांची ओळख झाली ती ऑनलाईन चॅटींगमधून. ऑनलाईन चॅटींग करताना हितेश टेमीलीसोबत थोडीफार तोडकी मोडकी इंग्रजी बोलत होता.

त्यांची ओळख झाल्यावर ते दोघे नंतर व्हिडिओ कॉल करू लागले. १ वर्ष त्यांच्यात हे असेच सुरू राहिले. त्यानंतर काही दिवसांपूर्वीच टेमीली अहमदाबादला पोहचली आणि हितेशसोबत विवाह केला.

टेमीली आणि हितेशची ऑनलाईन चॅटींगमधून झालेली ओळख प्रेमात बदलली. हितेशने सांगितले की, आमची ओळख फेसबुकवर झाली होती. काही काळातच आम्ही दोघे ऎकमेकांना पसंत करायला लागलो. जेव्हा टेमीली अहमदाबादला आली तेव्हा आम्ही चोटिला मंदिरात जाऊन लग्न केले. मला टेमीलीचा स्वभाव खूप आवडला. टेमीलीने या लग्नाबाबत सांगितले की, मला हितेश यामुळे आवडला कारण त्याने माझ्यापासून काहीही लपवले नाही. त्याची गरीब परिस्थीती सांगण्यात त्याला जराही संकोच केला नाही. यामुळेच त्याच्याशी लग्न करण्याचा मी निर्णय घेतला. काही दिवसांनी आम्ही दोघेही अमेरिकेला जाणार आहोत.

Leave a Comment