सलाम तुमच्या जिद्दीला!

edu
मुंबई : मुंबईत राहणाऱ्या ५१ वर्षीय कॉलेज स्टुडंट महिलेची ही कहाणी असून ह्युमंस ऑफ बॉम्बेच्या फेसबुक पेजवर या महिलेची कहाणी पोस्ट करण्यात आली आहे. ही पोस्ट अवघ्या काही तासातच तब्बल साडेसात हजाराहून अधिक वेळा शेअर करण्यात आली आहे.

१२वीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तब्बल ३० वर्षांनी डिग्रीचे शिक्षण घेण्याची संधी या महिलेला मिळाली. शिक्षणासाठी घेतलेल्या मेहनतीबद्दल या महिलेचे कौतुक केले जात आहे. मला माझे शिक्षण १२ वी झाल्यानंतर सोडावे लागले. यादरम्यान माझे लग्न झाले. सासरी आमचे एकत्र कुटुंब असल्यामुळे १२वी नंतर शिक्षण पूर्ण करण्यास वेळच मिळाला नाही. मात्र डिग्री मिळवण्याची माझी इच्छा कायम होती, असे त्या महिलेने सांगितले. दरम्यान, या महिलेचे नाव पोस्टमध्ये देण्यात आलेले नाही.

त्यांनी त्यांच्या तीनही मुलांना शिक्षणाच्या इच्छेमुळे क्लासेसमध्ये पाठवण्यापेक्षा घरातच शिकवले. मात्र २०१३ मध्ये मुलांच्या पाठिंब्यामुळे त्यांनी डिग्रीसाठी अॅडमिशन घेतले. त्यावेळी त्या ५१ वर्षांच्या होत्या. यंदाचे वर्ष त्यांचे डिग्रीचे अखेरचे वर्ष आहे आणि शेवटच्या वर्षातील परीक्षाही जवळ आल्यात. शिक्षण मिळवण्याची त्यांची इच्छा आणि मेहनत पाहून शिकण्यासाठी वयाचे बंधन नसते हे या उदाहऱणावरुन पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

Leave a Comment