सर्वात स्वस्त नेट पॅक देणार रिलायन्स!

reliance
मुंबई – लवकरच स्वस्त इंटरनेट घेऊन बाजारात दमदार ’एंट्री’ करण्याच्या तयारीत रिलायन्सची ’ जियो इन्फोकॉम’ ही कंपनी आहे. देशात आता सर्वात स्वस्त मोबाइल इंटरनेट वापरण्याचे दिवस येणार यांचे संकेत मिळाले आहेत. कंपनीची १० केबी डेटा केवळ ०.५ पैशांत देण्याची योजना आहे. टेलिकॉम कंपन्या सध्या १० केबीसाठी ४ पैसे इतका दर आकारात आहेत.

दिल्लीत रिलायन्स डिजिटल एक्सप्रेस स्टोर्समध्ये उपलब्ध असणा-या सिमकार्ड कीटमध्ये दिलेल्या माहितीनुसार, जियोच्या बेस टॅरिफमध्ये एसटीडी कॉल २ पैसे प्रति सेकंद, १ रुपया प्रति एसएमएस आणि ५ रूपये इंटरनॅशनल एसएमएसचा प्लान देण्यात आलेला आहे. या व्यतिरिक्त, नव्या प्लान नुसार ५ पैसे प्रतिसेकंद व्हिडिओ कॉलची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे. तथापि, हे सिमकार्ड कीट व्यावसायिक विक्रीसाठी जरी उपलब्ध नसले, तरी कंपनीच्या किंमती कशा प्रकारे असणार आहेत याचा अंदाज यावरून नक्कीच लावला जाऊ शकतो.

भारती एअरटेल, व्होडाफोन आणि आयडिया सेल्युलरसारख्या दिग्गज कंपन्यांच्या तुलनेत जियो इन्फोकॉम आपल्या या रणनीतीच्या आधारे पुढे जाऊ शकते. एका ग्राहकाला एक व्हिडिओ साँग ऐकण्यासाठी १ एमबी डेटाची आवश्यकता असते. या व्यतिरिक्त, तासभर यूट्यूबवर व्हिडिओ पाहण्यासाठी ४४० एमबी डेटा खर्च होत असतो. सिम कीटमध्ये देण्यात आलेले डेडा टॅरिफ हे बेस टॅरिफ आहे. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या डेटा पॅकच्या तुलनेत हे पू्र्णपणे वेगळे आहे.

Leave a Comment