भारतात महिलांसाठी लॉन्च झाला 'वेलवेट' कंडोम! - Majha Paper

भारतात महिलांसाठी लॉन्च झाला ‘वेलवेट’ कंडोम!

condom
नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य आणि परिवार कल्याणमंत्री जे.पी.नड्डा यांनी भारतामध्ये स्वदेशी पध्दतीने विकसित आणि प्राकृतिक लेटेक्स आधारित महिला कंडोम औपचारिकतेने लॉंच केला आहे.

राजधानी दिल्लीत लाइफकेअर लिमिटेडद्वारा निर्मित ‘वेलवेट’ या नावाने हे गर्भनिरोधक लॉन्च करण्यात आले आहे. हा कार्यक्रम दोन दिवसीय राष्ट्रीय कुटुंब नियोजन शिखर संमेलनात पार पडला. महिलांना सुरक्षित लैंगिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी तसेच गर्भनिरोधक म्हणून या कंडोमचा वापर होईल. एचआयव्ही / एडसपासून महिला स्वत:ला सुरक्षित ठेऊ शकतील. महिलांना सशक्त बनवण्याच्या दृष्टीने हे एक पाऊल असल्याचे नड्डा यांनी यावेळी म्हटले आहे. प्राकृतिक रबर लेटेक्स आधारित हे महिला कंडोम आहे. विश्व स्वास्थ्य संघटना (डब्ल्यूएचओ) नंही ‘वेलवेट’ला नुकतीच मान्यता दिली आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment